देशात दहशतवादी हल्ल्याचे सावट

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून हल्ला करण्याची धमकी
महत्वाची रेल्वे स्थानके, मंदीरे दहशतवाद्यांच्या रडारवर

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरविषयी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानबरोबरच दहशतवादी संघटनांचाही चांगलाच तांडव सुरू झाला आहे. दहशतवादी कारवाया करून देशात अशांतता पसरवण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातच आता पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी एका पत्राद्वारे देशात मोठे हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे. मुंबई, चेन्नई आणि बेंगलुरुसह देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. इतकेच नाही तर जैश-ए-मोहम्मदने रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त मंदिरे उडवण्याची धमकी दिली आहे.

रोहतक पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की हिंदीमध्ये लिहिलेले रोहतकच्या रेल्वे पोलिसांना पाठवण्यात आले होते. या पत्रावर मसूद अहमदने सही केली आहे. शनिवारी हे पत्र मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, एका वृत्तसंस्थेच्या वतीने जैश-ए-मोहम्मद 8 ऑक्‍टोबर रोजी देशाच्या सर्व भागात रेल्वे स्थानक उडवून दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेईल, असे या पत्रात म्हटले आहे. या रेल्वे स्थानकांमध्ये मुंबई, चेन्नई, बेंगलुरू, राजस्थान आणि हरियाणामधील रोहतक, रेवाडी आणि हिसार स्थानकांचा समावेश आहे. या क्षणी, त्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सतर्क झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)