मुंबई – अभिनेता हृतिक रोशनने पहिली पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर हृतिक रोशन सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते डेट करत आहे. अनेकदा ते एकत्र फिरताना पाहायला मिळतात. अशातच आता हे दोघे अर्जेंटिना येथे गेले आहेत. हृतिक आणि सबाचे येथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून मात्र आता पुन्हा एकदा हृतिकला ट्रोल करण्यात आले आहे.
नुकतेच अर्जेंटिना येथील ट्रीपचे काही फोटो हृतिकने आणि सबाने शेअर केले आहेत. यात दोघे एकतर वेळ घालवताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांचे फोटो पाहून एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘बहुतेक हृतिकला काळेभोर केस आणि गोऱ्या मुली आवडतात, जसे की कंगना, सुझैन आता सबा’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ”आपल्या पत्नीला सोडून हृतिक लहान मुलीसोबत फिरत आहे.”
दरम्यान, हृतिक आणि सबाच्या लग्नाच्या आणि एंगेजमेंटच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र अद्यापही त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. हृतिक रोशनने 2014 मध्ये सुझान खानसोबत घटस्फोट घेतला. यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. दुसरीकडे, सबाविषयी बोलायचे झाले तर, तिने 2008 मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, परंतु 2011 मध्ये आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाद्वारे तिला यश मिळाले.
View this post on Instagram
हृतिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक लवकरच दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.