मुंबई – बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील ‘वाजिद खान’ यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झालं आहे. ते 42 वर्षांचे होते.वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
यातच मिळालेल्या माहितीनुसार , वाजिद यांच्याआधीच त्यांच्या आईला करोनाची लागण झाली होती. किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या वाजिद यांचा नंतर करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रझिना यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे.