वाघोली : भाजपाच्या वतीने मोफत 2 हजार नागरिकांना लसीकरण उपक्रम

माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते उद्घाटन

वाघोली (प्रतिनिधी) :  वाघोली तालुका हवेली येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत 2 हजार नागरिकांना मोफत लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

याचे उद्घाटन भाजपा पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशजी भेगडे , संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, माजी सभापती रोहिदास उंद्रे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांचन , प्रवीण काळभोर, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे , यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  पुणे जिल्हा व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष जयप्रकाश सातव,अमोल शिवले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे , हवेली युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल सातव ,  पूनमताई चौधरी , केसनंद सरपंच नितीन गावडे, मांजरी सरपंच स्वप्नील उंद्रे, उपसरपंच राहुल सातव, तालुका उपाध्यक्ष दिनेश झांबरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश मोरे, दिनेश हरगुडे , अनिल हरगुडे , वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव, हवेली तालुका महिला आघाडी  अध्यक्षा सुप्रियाताई गोते,  वंदना शिवले, सुनीता आढाव, स्नेहल कुलकर्णी, विद्या पाटील, सोमा धरताई व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी आयोजन कामी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप सातव, हवेली तालुका भाजप उपाध्यक्ष  प्रदीप सातव  पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश सातव, शरद आव्हाळे, हवेली तालुका भाजप क्रीडा आघाडीच्या अध्यक्ष विजय जाचक,डॉ.स्नेहल कुऱ्हाडे, डॉ. स्वप्नील गावडे आदींनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.