वाघोली – न्हावी सांडस (तालुका हवेली) या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनामिका योगेश शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच बायडाबाई सदाशिव निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच नामदेव किसन शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली.
त्यामध्ये अनामिका शितोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष योगेश शितोळे, माजी सरपंच प्रदीप कांबळे, संदीप शितोळे, पांडुरंग शितोळे, किसन शितोळे, राजू पाटील शितोळे, संजय शितोळे, पोलीस पाटील काळुराम खाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश शितोळे, संतोष शितोळे, भरत शितोळे, रणजीत पन्हाळे, रविराज खाडे, मोहन खाडे, हनुमंत शितोळे, पांडुरंग शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर अनामिका शितोळे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, माजी सरपंच योगेश शितोळे, सरपंच नामदेव बापू शितोळे व सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले.