चंद्रपुर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातंर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारापेठ बिट कक्ष क्रमांक 956मध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह आज आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. या वाघिणीचा मृतदेह सितारामपेठ व कोडेंगाव परिसरातून वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ह शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वाघिणी मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी दिली. दरम्यान, या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीची शक्यता कमी असल्याचे समजते.