- वडगावकरांना दूषित पाणी : गढूळ पाणीपुरवठ्यावर भाजपकडून उपाययोजना
वडगाव मावळ – मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगावात नगरपंचायतीकडून शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. शहराला होणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यात शहरामध्ये होणाऱ्या दूषित आणि गढूळ पाण्यावर उपाययोजना म्हणून भारतीय जनता पक्ष व्यापारी आणि महिला आघाडी यांच्या वतीने चार हजार मेडिक्लोर एम बाटल्यांच्या वाटपाचा सोमवारी (दि. 27) “श्रीगणेशा’ केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते, तर मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, वडगाव शहर सरचिटणीस रवींद्र म्हाळसकर, वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळसकर, अरविंद पिंगळे, नारायण ढोरे, वसंतराव भिलारे, सोमनाथ काळे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, ऍड. विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, शामराव ढोरे, माजी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर,
सुनीता भिलारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळसकर, मावळ तालुका भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष शेखर वहिले, योगेश कृ. म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, शरद मोरे, नितीन कुडे, कल्पेश भोंडवे, शंकर भोंडवे, राजेंद्र म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, विनायक भेगडे, हरीश दानवे, श्रीकांत चांदेकर, समीर गुरव, महिला आघाडी सरचिटणीस वैशाली म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर, सविता सुराणा, अर्चना कुडे, श्रेया भंडारी, वैशाली वारिंगे, प्रियांका भोंडवे, दीपाली ढोरे, दीपाली सुतार आदी उपस्थित होते.
स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले. प्रास्ताविक धनश्री भोंडवे यांनी केले. सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी केले. रमेश ढोरे यांनी आभार मानले.
प्रभागनिहाय मेडिक्लिोरचे वाटप होणार
भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा आणि महिला आघाडी अध्यक्ष धनश्री भोंडवे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. वडगाव शहर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहयोगातून वडगाव शहरातील सर्व 17 प्रभागांमध्ये प्रभागनिहाय प्रत्येक घरी जाऊन वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
वडगाव शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत आम्ही दिलगिरी आहोत. लवकरात लवकर शुध्द पाणी पुरवठा होईल, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे.
– सुवर्णा ओगले, मुख्याधिकारी, वडगाव मावळ.