…आकाशात निसर्गाचा अद्‌भुत चमत्कार !

पुरंदर तालुक्‍यातील पिसर्वे गावात दिसली दुर्मिळ घटना

नीरा : पिसर्वे (ता. पुरंदर) गावात भर दुपारी आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आले होते. त्यावेळी निसर्गाचा दुर्मिळ असा चमत्कार दिसून आला. हा प्रकार पाहून पुरंदरकर चांगलेच चकीत झाले. वादळ सदृश असलेली शेपटी जास्त मोठी होत जाताना दिसली व नंतर त्या शेपटीच्या भोवती आजूबाजूचे ढग गोलाकार फिरताना साध्या डोळ्यांनी देखील पाहता येत होते.

पिसर्वे गावात रविवारी (दि. 26) दुपारनंतर आकाशात काळ्याकुट्ट ढगांमधून चक्रीवादळाप्रमाणे चक्राकार फिरणाऱ्या ढगांची शेपटी जमिनीच्या बाजूने दिसून आली. गावात राहणारे लोकं हा प्रकार पाहून अवाक्‌ झाले. जो तो हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करत होता.

आकाशात निसर्गाचा अद्‌भुत चमत्कारनीरा(प्रतिनिधी) – पिसर्वे (ता. पुरंदर) गावात भर दुपारी आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन…

Posted by Digital Prabhat on Monday, 27 July 2020

याबाबत पर्यावरण अभ्यासक आणि जलतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, परदेशातील टोरनॅडो प्रकारातील चक्रीवादळाचा हा प्रकार असून भारतामध्ये ही घटना दुर्मिळ चक्रीवादळाचा प्रकार आहे. टोरनॅडो प्रकारातील हे वादळ असून या वादळाची निर्मिती ज्या ठिकाणी ढगांची घनता जास्त आहे. त्या ठिकाणी याची निर्मिती होऊन ते पृथ्वीच्या दिशेने साधारणता अडीचशे फुटांपर्यंत खाली झेपावते. त्याला वेग जास्त असतो. परंतु, ते नुकसान करत नाही. ते पाऊस व ढगांमध्ये विरुन जाते. अशी वादळे जगभरात मोठ्या प्रमाणात होतात. अगदी उन्हाळ्यामध्ये देखील होतात. मात्र, आपल्याकडे पावसाळ्यात ढगांचे निरीक्षण केले तर कधीतरी दिसून येतात. म्हणून ती दुर्मिळ आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्‍यातील जेजुरी जवळील मल्हारसागर तलावात दोन वर्षांपूर्वी असेच वादळ जमिनीच्या पृष्ठभागावर जलाशयात तयार होऊन आकाशाकडे झेपावले होते. त्यामुळे काही वेळात प्रचंड मुसळधार पाऊस झाला होता. काल पुन्हा दुसऱ्यांदा पुरंदर तालुक्‍यातच हे दुर्मिळ वादळ दिसले आहे. मात्र, हे वादळ आकाशात तयार होऊन जमिनीकडे झेपावताना दिसले होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर हे वादळ ढगांमध्ये विरुन गेले असल्याचे स्थानिक रहिवासी संदिप बनसोडे यांनी सांगितले.

नेमकं काय याचे वैशिष्ट्य ?

वेगवेगळ्या तापमान आणि आर्द्रतेच्या दोन वस्तुंना निलंबित केल्यावर टोरनॅडो तयार होतो. गरम पाणी बाष्पात रूपांतरित करून आणि वरील वातावरणापर्यंत पोहोचत असताना, ते थंड हवेने प्रक्रिया करते आणि वादळ म्हणून बाहेर येते. उच्च तापमानामुळे उर्जेची पातळी वाढते आणि शेवटी वादळाचा वेग, पाऊस आणि इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर, वादळी वाऱ्याचा तीव्र झगमगारा गोल गोल आकाशात जाताना दिसतो. ज्याच्या वरती पडलेली धूळ स्तंभ म्हणून दिसते. बऱ्याच वेळा हे तुफान धोकादायक रूप देखील घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.