मुंबई – ‘बिग बॉस ओटीटी’चे सध्या दुसरे पर्व सुरु असून याला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या हा सीझन अंतिम टप्प्यात असून ‘वेड’ फेम जिया शंकर बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता टॉप पाच स्पर्धक शोला मिळाले आहेत. यातून आता एका स्पर्धकाचे ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये विजेतेपदावरनाव कोरले जाणार आहे.
मागील आठवड्यातच जैद हैदीद व अविनाश सचदेव हे दोघे बाहेर पडले होते. मात्र बिग बॉसने अचानक मिड वीक एविक्शन घेतलं. ज्यात जिया शंकर, एल्विश यादव व मनीषा रानी यांचा समावेश होता. मात्र यात जियाला कमी मत मिळाल्याने तिचा बिग बॉसमधील प्रवास संपला. यावेळी ती खूप भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच तिने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल चाहत्यांचे आणि बिग बॉसचे आभार मानले. मात्र जिया बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जिया बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जिंकण्यासाठी पात्र होती’ असे म्हणत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mid week elimination
As expected, jiya shankar got eliminated from BB House.#BBOTT2 #BiggBossOtt2 pic.twitter.com/nPhdGkrkRW
— Disha (@dishagoyal539) August 9, 2023
जिया घराबाहेर गेल्यामुळे आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाला पूजा भट्ट, मनिषा रानी, अभिषेक मल्हान, बेबिका धुर्वे आणि एल्विश यादव हे टॉप पाच सदस्य मिळाले आहेत. यातून आता कोण बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, दुसऱ्या अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री ‘जिया शंकर’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणार असल्याचे समजताच चाहते आनंदी झाले होते. जियाने मराठीसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील चित्रपट केले आहेत. वेड चित्रपटात रितेश देशमुखसोबत जियाने ‘निशा’ हे पात्र साकारले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली होती.