पश्चिम बंगाल मध्ये मतदानाला गालबोट

मतदारांनी केला निषेध

पश्चिम बंगाल – लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सर्वत्र जोरदार सुरवात झाली आहे. सर्व नागरिक आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी करू लागले आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तर, याठिकाणी काही भागात मतदानला गालबोट लागल्याचे समोर चित्र दिसून येत आहे.

बशीरहाट मध्ये 189 नंबरच्या मतदान केंद्राबाहेर बाहेर मतदारांनी निषेध केला आहे. ‘आम्हाला मत देण्याची परवानगी दिली नाही’. असा आरोप टीएमसी कामगारांनी केला आहे. याठिकाणी 100 लोकांना आपला मतदानाचा हक्क बाजवण्यापासून लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी हिंसेचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्‍चिम बंगालमधील डमडम, बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर या भागांमध्ये आज मतदान पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.