गडचिरोली – महाराष्ट्रातील गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून ठेवला आहे. आज पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी गडचिरोली परसातील एका अज्ञात ट्रकला टार्गेट करून त्याची तोडफोड केली असून, त्यावर आपले संदेश पत्रक लावले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी देखील सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
Maharashtra: Naxals have torched a truck at a wood depot in Gadchiroli. pic.twitter.com/CKlgT9nGHs
— ANI (@ANI) May 19, 2019
दरम्यान, यापूर्वी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण असताना. गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यांच्या हल्ल्याचा अनेक ठिकाणाहून निषेध करण्यात होता.