नवी दिल्ली – सरकारचे देणे आणि कर्जाच्या बोजाखाली अडकलेली कंपनी व्होडाफोन आयडिया 25 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीला यासाठी परवानगी दिली आहे.
एकत्रित महसुलाच्या आधारावर सरकारचा हिस्सा 10 वर्षांत द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यातील दहा टक्के रक्कम कंपनीला या वर्षाच्या अखेरपर्यंत सादर करायचे आहे. या घडामोडीमुळे या व इतर मोबाईल कंपन्याच्या शेअरचा भाव गेल्या आठवड्यात बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.