लोणी काळभोर -सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस व महाराष्ट्रावर टीका करून अविश्वास व्यक्त करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून, जोडे मारून व प्रतिमा जाळून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
शिवसेना हवेली तालुक्याच्यावतीने व पुणे जिल्हा महिला संघटक श्रद्धा संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वयक उर्मिला भुजबळ, तालुका संघटक छाया महाडिक, तालुका समन्वयक अलका सोनवणे, उपतालुका संघटक कुंदा कदम, विभाग संघटक रुक्मिणी मासळकर, उपविभाग संघटक शुभांगी बगाडे, वनिता पाटील, दिप्ती भागवत, कौशल्या राऊत, जिल्हा संघटक रमेश भोसले, राजेंद्र जोशी, युवासेना विभाग प्रमुख अजय माने व शिवसैनिक उपस्थित होते.