पुणे – व्हिजन स्पोर्टस् सेंटर आयोजित पहिल्या व्हिजन प्रिमिअर लीगफ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत व्हिजन जॅग्वॉर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. व्हिजन लायन्स् संघाने व्हिजन पॅंथर्स संघाचा पराभव करून पहिल्या विजयाची नोंद करून गुणांचे खाते उघडले.
या स्पर्धेत सोहम उल्हाळकर याने फटकावलेल्या नाबाद 60 धावांच्या जोरावर व्हिजन जॅग्वार्स संघाने व्हिजन टायगर्सचा 6 गडी राखून पराभव केला. व्हिजन टायगर्सने 20 षटकात 5 गडी गमावून 147 धावांचे आव्हान उभे केले. व्हिजन जॅग्वॉर्स संघाने हे आव्हान 4 गडी गमावून अखेरच्या षटकामध्ये पूर्ण केले. सोहम उल्हाळकर याने नाबाद 60 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. व्हिजन जॅग्वार्स संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला.
अनिल डोमकावळे याच्या अष्टपैलू खेळीमुळे व्हिजन लायन्स् संघाने व्हिजन पॅंथर्स संघाचा 18 धावांनी पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली. व्हिजन लायन्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 158 धावा धावफलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन पॅंथर्सचा डाव 19.1 षटकात 140 धावांवर आटोपला. व्हिजन लायन्स् च्या चिन्मय देशमुख याने 13 धावात 4 गडी तर, अनिल डोमकावळे याने 14 धावात 2 गडी टिपत गोलंदाजीची बाजू सांभाळली.
संक्षिप्त धावफलक – (गटसाखळी फेरी )
1) व्हिजन टायगर्स : 20 षटकात 5 बाद 147 धावा. (विशाल यादव 47, शंतनु वाळुंजकर 30, प्रदीप साळुंके 24, विजय पांडे 2-31) पराभूत वि. व्हिजन जॅग्वार्स ः 20 षटकात 4 बाद 148 धावा. (सोहम उल्हाळकर नाबाद 60, गिरीष कोंडे 21, ऋत्विक शिंदे 14, ओंकार चांदगुडे 2-32). सामनावीर: सोहम उल्हाळकर.
2) व्हिजन लायन्स : 20 षटकात 6 बाद 158 धावा. (अनिकेत भोसले 63, यश कुचेकर 21, अनिल डोमकावळे नाबाद 16, जसवंत माळी 3-17) वि. वि. व्हिजन पॅंथर्स ः 19.1 षटकात सर्वबाद 140 धावा. (साहील भामे 29, दुर्गेश मोर्य 17, विकास सहानी 14, चिन्मय देशमुख 4-13, अनिल डोमकावळे 2-14). सामनावीर : अनिल डोमकावळे.