पुणे – व्हिजन स्पोर्टस सेंटर आयोजित पहिल्या व्हिजन प्रीमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत व्हिजन लिंक्स् आणि व्हिजन लायन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या बाद फेरीकडे वाटचाल केली.
व्हिजन लायन्स् संघाने व्हिजन टायगर्सचा 3 गडी राखून पराभव केला. लायन्सचा हा तिसरा विजय ठरला. व्हिजन टायगर्सने 18.5 षटकांत 10 गडी गमावून 121 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान व्हिजन लायन्सने 18 षटकांत व 7 गडी गमावून पूर्ण केले.
व्हिजन लिंक्स् संघाने व्हिजन लेपर्ड्स संघाचा 122 धावांनी धुव्वा उडवून बाद फेरीकडे वाटचाल केली. व्हिजन लिंक्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 175 धावा धावफलकावर लावल्या. व्हिजन लेपर्डस संघाचा डाव 11.4 षटकांमध्ये 53 धावांवर गुंडाळला.
संक्षिप्त धावफलक – (गटसाखळी फेरी ) :
1) व्हिजन टायगर्स : 18.5 षटकांत सर्वबाद 121 धावा. (ओंकार हिंगे 17, अर्णव शिरोळे 20, अनिल डोमकावळे 3-17, चिन्मय देशमुख 2-9) पराभूत वि. व्हिजन लायन्स : 18 षटकांत 7 बाद 122 धावा. (अनिकेत भोसले 34, सागर कांबळे 41, ओंकार चांदगुडे 3-25, शिवराम यादव 2-20). सामनावीर ः अनिल डोमकावळे.
2) व्हिजन लिंक्स : 20 षटकांत 3 बाद 175 धावा. (नीलेश माळी 69, रणवीर मते 36, प्रेम चौदांते 26, लक्ष्मण कत्रावत 2-51). वि. वि. व्हिजन लेपर्ड्स : 11.4 षटकांत सर्वबाद 53 धावा. (शाम यादव 22, शुभम कोठारी 4-0, महंमद सुफियान 3-10). सामनावीर : नीलेश माळी.