पुणे – एजीए मॅनेजमेंट आयोजित पहिल्या एमरल्ड करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुणे स्ट्रायकर्स आणि स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पुणे स्ट्रायकर्स संघाने चॅम्पियन्स् क्रिकेट क्लब संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला. चॅम्पियन्सचा डाव 20 षटकांत 117 धावांवर आटोपला. पुणे स्ट्रायकर्सने हे लक्ष्य 10.2 षटकांत व 2 गडी गमावून पूर्ण केले.
स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने फ्रेन्ड्स इलेव्हन क्लबचा 78 धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्टॅलियन्स् संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 232 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाला उत्तर देताना फ्रेन्ड्स इलेव्हन क्लबचा डाव 20 षटकांत 6 गडी गमावून 154 धावांवर मर्यादित राहिला. स्पर्धेचे उद्घाटन अनिस काचवाला आणि स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गिरीश ओक, अमित उमरीकर, शंतनू आठवले आणि आदित्य पाळंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
1) चॅम्पियन्स् क्रिकेट क्लब : 20 षटकांत सर्वबाद 117 धावा. (सुभाष काळे 49, परेश साहू 21, हुजेफ पूनावाला 4-11, महंमद लोखंडे 2-24) पराभूत वि. पुणे स्ट्रायकर्स : 10.2 षटकात 2 बाद 125 धावा. (हुजेफ पूनावाला 53, हमझा पानसरी 34, निरंजन जोशी 1-13). सामनावीर ः हुजेफ पूनावाला.
2) स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब : 20 षटकांत 4 बाद 232 धावा. (पवन आनंद नाबाद 58, गीत देसाई 57, नितीश सप्रे 49, हिमांशू अगरवाल 24, अनिल मांडके 1-32). वि. वि. फ्रेन्ड्स इलेव्हन क्लब : 20 षटकांत 6 बाद 154 धावा. (सुमित खोले 37, अनिल मांडके 36, पवन आनंद 2-30, हिमांशू अगरवाल 1-8). सामनावीर – पवन आनंद.