जमैका – पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडीज महिला संघ घोषित करण्यात आला आहे. पाकिस्तान दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वकरंडक पात्रता फेरीसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडीज संघात शेमेन कॅंपबेलचे पुनरागमन झाले आहे. दुखापत झाल्यामुळे तिला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत खेळता आले नव्हते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत न खेळणाऱ्या कर्णधार स्टेफनी टेलरचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडीज महिला संघ 1 नोव्हेंबरला पाकिस्तानात दाखल होणार आहे.
येत्या 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. सर्व सामने कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळले जातील. त्यानंतर संघ झिम्बाब्वेला रवाना होणार आहे. तिथे 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत असणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता सामन्यात भाग घेईल.
वेस्ट इंडीज महिला संघ – स्टेफनी टेलर (कर्णधार), अनिसा महंमद, आलिया एलन, शेमेन कॅंपबेल, शामिलिया कनल, डियांड्रा डॉटिन, शेनेट ग्रिममंड, शिनेल हेनरी, कियाना जोसेफ, किसीया नाइट, किशोना नाइट, हेली मॅथ्यूज, शीडिन नेशन, शकीरा सेलमन, रशदा विलियम्स.