Vishwajit Kadam | Vishal Patil | Sangli Lok Sabha – महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेवरील तिढा वाढत असून तो दिल्ली दरबारी पोहोचला आहे. यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दुसरीकडे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवत असल्याचे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी घोषित केली आहे. येथून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छूक आहेत. । Vishwajit Kadam | Vishal Patil | Sangli Lok Sabha
या जागेसाठी राज्यात महाविकास आघाडीत तोडगा निघत नसल्याचे वाटत असल्यामुळे आमदार विश्वजीत कदम आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहे.
दुसरीकडे कोल्हापूर, रामटेक, अमरावती या तीन जागा काँग्रेसला दिल्या असल्याचे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जागा वाटपाच्या चर्चांमध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटत असते की आपली ताकद आहे.
त्यामुळे ती जागा आपण लढावी अशी त्यांची भूमिका असते. विशाल पाटील हे महत्त्वाचे नेते आहेत. विशाल पाटील, विश्वजीत कदम यांच्या भूमिकाचा आम्ही आदर करतो, असे म्हणत संजय राऊत यांनी विशाल पाटील यांना न्याय मिळेल असे म्हटले आहे. । Vishwajit Kadam | Vishal Patil | Sangli Lok Sabha