नवी दिल्ली – भारतातील पर्यटकांना १५ दिवस व्हिसामुक्त प्रवेश देण्याच्या धोरणाला इराणमध्ये मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भारतीय प्रवासी केवळ पासपोर्टच्या आधारे इराणमध्ये प्रवेश करू शकतील. ते इराममध्ये १५ दिवसांपर्यंत व्हिसा शिवाय राहू शकतील.
अशाप्रकारे ६ महिन्यात एकदा ते व्हिसाशिवाय इराणमध्ये जाऊ शकणार आहेत. या मुक्कामाची कालमर्यादा वाढवण्यासाठी किंवा ६ महिन्याच्या आत पुन्हा इराणमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना नियमित व्हिसा मिळवणे अनिवार्य असणार आहे.
व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांनीही भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. भारतीय पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश देणारा इराण गेल्या काही महिन्यांत सर्वात नवीन देश बनला आहे.