पिंपरी – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प पाहण्यासाठी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये संपन्न झाली. एकंदरीत हा अर्थसंकल्प अंतरिम व अभासी असल्यामुळे विविध क्षेत्रातील उद्योजकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
बैठकीला फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे, लघु उद्योग संस्थेचे उपाध्यक्ष रमाकांत पोतदार, पिंपरी चिंचवड हॉटेल संघटनेचे उपाध्यक्ष शंकर चक्रवर्ती, पिंपरी चिंचवड बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, कान्ज्युमर डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष कन्हैयालाल राजपाल, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे संकेत पाडवे.
पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकाउंटंट संघटनेचे चार्टर अकाउंटंट संतोष फुलारे, पिंपरी चिंचवड महिला उद्योग विकास केंद्राच्या अध्यक्षा मनीषा पानसरे, सेवा उद्योग क्षेत्रातील उद्योजक केतन कारखानीस, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असोसिएशनचे नंदकुमार जगदाळे, ग्रामीण उद्योजकता विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती आगमे आदी मान्यवर उपस्थित होते.