अरविंद केजरीवाल म्हणाले,”इंदोर अन् सुरतचे लोक निवडणुकीपूर्वी पळून गेले”

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आमदारांना सांगितले की, तुमच्यापैकी अनेकांना आमिष दाखवून आणि धमक्या देऊन तोडण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सर्वजण खंबीर राहिलात. कोणीही फुटले नाही. तसेच इंदोर अन् सुरतचे लोक निवडणुकीपूर्वी पळून गेले” असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
बैठकीत केजरीवाल यांनी, “मी २१ दिवसांसाठी बाहेर आलो असून मला २ जूनला परतायचे आहे. त्यानंतर तुम्ही सर्वांनी पक्ष सांभाळावा. आम आदमी पक्षच या देशाला भविष्य देऊ शकतो. देशातील जनतेने इतर सर्व पक्षांना आजमावले आहे. आज देशाची स्थिती अशी आहे की आगामी काळात फक्त आम आदमी पक्षालाच देशाची धुरा सांभाळायची आहे. आम आदमी पार्टीच देशाला भविष्य देईल, त्यामुळेच त्यांना आम आदमी पार्टीची भीती वाटते.
‘अटकेनंतर पक्ष अधिक एकजूट’ Arvind Kejriwal ।
पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर केजरीवाल यांनी, “अटकेपूर्वी भाजपचे लोक भेटायचे तेव्हा ते म्हणायचे की हे लोक तुम्हाला अटक करतील, मग तुमचा पक्ष फोडून सरकार पाडू. दुसरीकडे पंजाबमध्ये भगवंत मान यांना सोबत घेणार आहोत. पण माझ्या अटकेनंतर आमचा पक्ष अधिक एकजूट झाल्याचे केजरीवाल म्हणाले. त्यांना ना आमचे सरकार पाडता आले ना आमदार फोडता आले. पंजाब सरकारवर कोणीही ताशेरे ओढू शकले नाहीत. त्यांची संपूर्ण योजना फसल्याचे केजरीवाल म्हणाले.
‘देव आपल्याला काहीतरी करायला लावतोय’ Arvind Kejriwal ।
परवा सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आला, तो माझ्या मते चमत्कारापेक्षा कमी नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या दीड महिन्यात घडलेल्या घटनांवरून मला असे वाटते की देव आपल्याकडून काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे, आपण फक्त एक साधन आहोत. दरम्यान केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला आपचे आमदार अमानतुल्ला खान उपस्थित नव्हते.
हेही वाचा
“…मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही?”; आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल





