ममता बॅनर्जी यांना धक्का ; तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

Swastika Maheshwari । देशात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा उद्या पार पडणार आहे. मात्र असे असले तरी अजूनही पक्ष बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. अशातच चौथ्या टप्प्यातील मतदानाआधीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसलाय. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मुकुटमणी अधिकारी यांची पत्नी स्वास्तिका माहेश्वरी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात स्वास्तिका माहेश्वरी यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. स्वस्तिका माहेश्वरीने पतीला घटस्फोट देण्याकरता कोर्टात अर्ज केलाय भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत राणाघाट येथे पक्षाच्या मेळाव्यात त्या भाजपामध्ये सामील झाल्या.
“मुकुटमणीला मतदान करेल त्याची फसवणूक होईल Swastika Maheshwari ।
पक्ष प्रवेशावेळी स्वास्तिका माहेश्वरी यांनी,“मुकुटमणी अधिकारी यांना जो कोणी मतदान करेल, त्याची माझ्यासारखीच फसवणूक होईलमतदान करेल”, म्हटलं. यामुळे मुकुटमणी अधिकारी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. मुकुटमणी अधिकारी यांचं गेल्यावर्षीच लग्न झालं. परंतु, लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तिने पतीवर क्रूरतेचा आरोप केलाय.
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुकुटमणी अधिकारी यांचा अर्ज वादात सापडलाय. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते राणाघाट लोकसभेच्या सातपैकी एक असलेल्या राणाघाट-दक्षिण मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले.
भाजपामधून तृणमूलमध्ये केला होता प्रवेश Swastika Maheshwari ।
या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी राणाघाटमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने त्यांचा मुद्दा काढण्यास सुरुवात केल्याने अखेर त्यांनी गेल्या महिन्यात विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजकीय घडामोडीनंतर त्यांच्या पत्नीनेही भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा
अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत ! आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ; जाणून घ्या काय आहे प्रकरण





