#CWC19 : बेशिस्त वर्तनाबद्दल विराट कोहलीस दंड

साउदॅम्पटन – पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल भारताचा कर्णधार याला एक दिवसाच्या मानधनाच्या 25% रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या लढतीचेवेळी ही घटना घडली.

सामन्याच्या 25 व्या षटकात जसप्रित बुमराह याचा चेंडू अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाह याच्या पायावर जोरात आदळला. पायचीतचे अपील करताना कोहली याने पंच अलीम दार यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्याशी हुज्जत घातली. पंच दार यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केलेल्या नियमावलीचे उल्लंघन कोहली याच्याकडून झाले असल्याचा अहवाल देत कोहली याला एक दिवसाच्या मानधनातील 25% रक्कम दंड म्हणून कपात करावी असा निर्णय दिला आहे.

त्याचप्रमाणे आयसीसीच्या नियमावलीनुसार कोहली याच्या नावावर आता दोन दोषांक झाले आहेत. साधारणपणे खेळाडूंच्या मैदानावरील वर्तनाबद्दल दोन वर्षांचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याच्यावर आणखी दंडात्मक व सामने खेळण्याच्या बंदीची कारवाई ठरविली जाते. कोहली याने आपल्याकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्याची कबुली दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.