Virat Kohli BirthDay – भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील विविध क्षेत्रांतून विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय संघाच्या खेळाडू आणि प्रशिक्षकासोबत कोहलीने त्याच्या वाढदिवसाचा केक कापला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, विराट कोहलीने टी-२० विश्वचषकच्या अंतिम सामन्याबाबत एक मोठे विधान केले आहे. याबाबत बोलताना विराटने म्हटले आहे की, त्याला पुढील आठवड्यात एक मोठा केक कापायचा आहे.
#T20WorldCup2022 | इंग्लंडचा श्रीलंकेवर थरारक विजय अन् ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास
विराट ( Virat Kohli ) त्याचे अनेक चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्याबरोबर त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. बीसीसीआयने विराटच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक हृदयाला स्पर्श करणारी बात बोलली आहे. “आता मला पुढच्या आठवड्यात एक मोठा केक कापायला आवडेल”, असे विराटने म्हटले आहे.
टी-२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना पुढील आठवड्यात १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. त्यामुळेच विराट कोहलीने आपल्या बोलण्यातून भारतचं हा विश्वचषक जिंकणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच विराटने ( Virat Kohli ) त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हटले की, “मला फक्त एक केक कापायचा आहे जो पुढच्या आठवड्यात कापला जाईल.”
Virat Kohli said “I want to cut only one cake which is the big one next week”.
— Johns. (@CricCrazyJohns) November 5, 2022
विराट कोहली ( Virat Kohli ) हा टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १०६५ धावा ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याबाबतीत त्याने श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेला (१०१६ धावा ) मागे टाकले आहे. त्याचबरोबर यंदाच्या स्पर्धेत विराटच्या बॅटने फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याने मागील खेळलेल्या ४ सामन्यात ३ अर्धशतके ठोकले आहेत. त्यामुळे आता पुढील महत्वाच्या सामन्यात त्याच्याकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी अपेक्षा असणार आहे.