T20 WorldCup 2022 – इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी सुपर-१२च्या गट-१ मधील शेवटचा साखळी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड संघाने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबतच इंग्लंडच्या या विजयाने गतविजेता ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषकातून ( T20 WorldCup ) बाहेर पडला आहे. सुपर-१२च्या गट-१ मधून न्यूझीलंड आणि आता इंग्लंड असे दोन्ही संघ सेमीफायनासाठी पात्र ठरले आहेत.
शाहीद आफ्रिदीच्या आरोपांचा BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी घेतला समाचार, पाकिस्तानची बोलती बंद
सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पथुम निसांकाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ८ बाद १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने १९.४ षटकांत ६ बाद १४४ धावा करत सामना जिंकला.
गट-१ मधील न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांनी ७-७ गुण मिळवले होते, परंतु न्यूझीलंडचा नेट रनरेट सर्वाधिक होता. त्यामुळे न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी राहिला. त्यानंतर इंग्लंडचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असल्याने त्यांना दुसरे स्थान मिळाले. यामध्ये ऑस्ट्रेलियाचेही ७ अंक होते मात्र त्यांचा नेट रनरेट न्यूझीलंड आणि इंग्लंडपेक्षा खराब असल्याने तिसरे स्थान मिळाले. त्यामुळे आता गतविजेत्या कांगारूंना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ आता सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ( T20 WorldCup )
A thriller in Sydney and England hold their nerve to book a spot in the semi-finals! 🤯#T20WorldCup | #SLvENG | 📝: https://t.co/goECJqYlQs pic.twitter.com/qwTrgQL06i
— ICC (@ICC) November 5, 2022