दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अंजिक्य रहाणेची मात्र नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
विराट कोहली ९२८ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. दुस-या क्रमांकावर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ असून तो विराटपेक्षा १७ गुणांनी मागे आहे. भारताचा चेतेश्वर पूजारा ७९१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे तर नवव्या स्थानावरच्या रहाणेकडे ७५९ गुण आहेत.
गोलंदाजीत पहिल्या दहामध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह ६ व्या, मोहम्मद शमी ९ व्या तर आर. आश्विन ८ व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिस-या स्थानावर आहे.