ऍड. आशिष ताम्हाणे यांची नोटरी पदी नियुक्ती

पुणे : पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ऍड. आशिष ताम्हाणे यांची नोटरी पदी निवड झाली आहे. त्यांच्या आसमी टॉवर्स येथील कार्यालयाचे नुकतेच उदघाटन झाले. त्यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुधीर शहा आणि ऍड. बी.एच.निकते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्यापालन करून नोटरी पदाचा व्यवसाय म्हणून नव्हे, तर, सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या भल्यासाठी उपयोग करेन. तळागाळातील उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देईल, असे ऍड. आशिष ताम्हाणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र गोवाचे सदस्य ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. जी.एस.यवतकर, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. एस.बी.पवार, ऍड. विकास ढगे पाटील, ऍड. अशोक संकपाळ, ऍड. के.टी. आरू, ऍड. रेखा करंडे, ऍड. शिरीष शिंदे, माजी न्यायाधीश मुरलीधर पातळे, ऍड. कुमार पायगुडे, ऍड. मनिष मगर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, सरपंच मयुर भांडे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, ऍड. आशिष सरभुकन, ऍड. सुमंत पातळे, ऍड. शेखर हरगुडे, ऍड. शेखर पवार, ऍड. प्रतिक ताम्हाणे, ऍड. अजय ताम्हाणे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.