Virat Kohli in IPL 2024 : आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सामना झाला. मोसमाला सुरुवात होताच विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत, परंतु आता त्याने आपल्या T20 कारकिर्दीत 12,000 धावा पूर्ण केल्या आहेत आणि असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे. 12 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील फक्त सहावा फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीने पूर्ण केल्या 12 हजार धावा….
IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात CSK विरुद्ध 6 धावा करून विराट कोहलीने आपल्या T20 कारकिर्दीत 12,000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने आपल्या T20 कारकिर्दीत आतापर्यंत 377 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 359 डावांमध्ये 12,000 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी41.21 आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतकांची खेळीही खेळली आहे. T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद 12 हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा खेळाडू आहे.
यापूर्वी कोहली या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला होता, त्याने 353 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय T20 आणि T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा किंग कोहली T20 फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवत आहे.
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय, झाम्पाच्या जागी ‘या’ घातक फिरकीपटूचा संघात केला समावेश…
कोहलीच्या आधी 5 खेळाडूंनी केली आहे ही कामगिरी…
विराट कोहलीपूर्वी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली आहे. T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ख्रिस गेल आहे. त्याने आतापर्यंत 463 सामन्यांत 14,562 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीत त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेषत: शतकांच्या बाबतीत कोहली खूप मागे आहे.