नवी दिल्ली – टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohali) आणि एबी डिव्हिलियर्स (ABD) यांच्यातील मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. दोघेही दीर्घकाळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) आयपीएलमध्ये (IPL) खेळले होते आणि यादरम्यान त्यांची मैत्री खूप घट्ट झाली.दोन्हही स्टार खेळाडूंमधील मैत्री किती घट्ट आहे हे नुकतेच दिसून आले.दोन्हही खेळाडू मैदानावर एकत्र दिसून येताच फॅन्सही खुश झाले.
ICC एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३७व्या सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे.क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना खूप खास आहे, कारण आज टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस खूप खास बनवण्यासाठी त्याचा जिवलग मित्र एबी डिव्हिलियर्स (AB deVilliers) ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर पोहोचला.
विश्वचषकाचा (WorldCup 2023) ३७ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स विराट कोहलीला भेटण्यासाठी ईडन गार्डनवर पोहोचला.एबी डिव्हिलियर्सने किंग कोहलीला मिठी मारली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही खेळाडू बराच वेळ एकमेकांशी बोलताना दिसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
The hug moments of Virat Kohli and Ab De Villiers at Eden gardens.
– What a lovely moments!pic.twitter.com/ub7QPa6TGC
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 5, 2023
भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने सलग 7 सामने जिंकून विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया सध्या 14 गुणांसह विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.