IND vs SA 2nd Test Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे तर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू झाला, ज्याच्या पहिल्या सत्रात असे काही घडले ज्याची दोन्ही संघांना अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 153 धावांवरच आटोपला आहे आणि भारताने 98 धावांची आघाडी घेतली आहे.
From 153/4 to 153 all out 😲
After South Africa, India too have been bowled out on Day 1 ☝#WTC25 | 📝 #SAvIND: https://t.co/ie8HUxBDc8 pic.twitter.com/hIcqFTdrke
— ICC (@ICC) January 3, 2024
भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या आहेत. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना खाते उघडता आले नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.
पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ सामन्यात पुढे आहे. आता दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाज हा सामना डावाच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतील. खेळपट्टीचा विचार करता भारतासाठी 50 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य अवघड असू शकते.
IND vs SA 2nd Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडेन मार्करम (2 धावा), डीन एल्गर (4 धावा), टोनी डी जॉर्जी (2 धावा), ट्रिस्टन स्टब्स (3 धावा), मार्को यानसेन (0 धावा), केशव महाराज (3 धावा), कगिसो रबाडा (5 धावा), नांद्रे बर्गर (4 धावा) हे स्वस्तात बाद झाले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 विकेट्स घेऊन पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.