Today Cricket Live Score, IND vs SA 1st Test 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू झाला आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसीद कृष्णाने भारतासाठी पदार्पण केले आणि डेव्हिड बेडिंगहॅमने दक्षिण आफ्रिकेसाठी नांद्रे बर्जरसह पदार्पण केले.
पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा केल्या आहेत. विराट कोहली 33 आणि श्रेयस अय्यर 31 धावांवर नाबाद आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
Virat Kohli and Shreyas Iyer steady ship for #TeamIndia with a 67* run partnership in the first session.#TeamIndia 91/3 at Lunch on Day 1 of the 1st Test.
Scorecard – https://t.co/032B8Fmvt4 #SAvIND pic.twitter.com/18p2abb5D6
— BCCI (@BCCI) December 26, 2023
उपाहारापूर्वी भारताला तीन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल 17 धावा करून, रोहित शर्मा 5 धावा करून आणि शुभमन गिल 2 धावा करून बाद झाले. नांद्रे बर्गरने दोन गडी बाद केले. कागिसो रबाडाला एक यश मिळाले आहे.
IND vs SA Test : शुभमन गिलही अपयशी ठरला
भारताला पहिल्या डावात तिसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. शुभमनने 12 चेंडूत दोन धावा केल्या. नांद्रे बर्जरच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक काइल व्हेरेयनकरवी झेलबाद झाला. शुभमन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला आहे.
IND vs SA Test : भारतीय संघाला दुसरा धक्का…
भारतीय संघाला पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या रूपाने दुसरा धक्का बसला. 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. नांद्रे बर्जरच्या चेंडूवर तो काइल व्हेरेयनकरवी झेलबाद झाला. जैस्वालने 37 चेंडूत 17 धावा केल्या. बर्जरने पदार्पणाच्या कसोटीत पहिली विकेट घेतली. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला.
IND vs SA Test : कर्णधार रोहित ठरला अपयशी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माला काही विशेष करता आले नाही. 14 चेंडूत पाच धावा करून तो बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला आपला बळी बनवले. रबाडाचा उसळता चेंडू मारण्याचा प्रयत्न करत असताना फाइन लेगवर उभा असलेला क्षेत्ररक्षक नांद्रे बर्गरकडे त्याने झेल दिला. रबाडाने 10 डावात सहाव्यांदा त्याला आपला बळी बनवले.
दरम्यान, अवघ्या 36 दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेत 31 वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकूण ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या बॉक्सिंग डे कसोटी मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. 1992 पासून दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही नववी कसोटी मालिका असेल, परंतु आतापर्यंत या देशात भारत एकही मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सध्याची मालिकाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक आव्हान असणार आहे.