#SAvsIND 1st Test, KL Rahul Century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले आणि अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. यातील 101 धावा केएल राहुलच्या होत्या. उर्वरित फलंदाजांना एकूण 131 धावा करता आल्या. तर, 13 धावा एक्स्ट्रा आल्या.
चौकार-षटकारांनी केलेल्या तिसऱ्या सर्वाधिक धावा
राहुलने 137 चेंडूत 101 धावा करताना 14 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या डावात त्याने 100 धावांपैकी 80 धावा या चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या, म्हणजे एकूण धावांपैकी 79.20 टक्के धावा चौकार आणि षटकारांनी केल्या. कसोटीत शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाने चौकार आणि षटकारांनी केलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा आहेत. यामध्ये शिखर धवन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आघाडीवर आहेत. शिखर धवन याने बेंगळूरूत 2018 मध्ये 107 धावांपैकी 94 धावा या चौकार-षटकाराच्या मदतीने केल्या होत्या तर वीवीएस लक्ष्मण याने नेपियर येथे 2009 मध्ये नाबाद 124 धावापैकी 100 धावा या चौकार-षटकाराच्या मदतीने केल्या होत्या.
A magnificent CENTURY for @klrahul 👏👏
He’s stood rock solid for #TeamIndia as he brings up his 8th Test 💯
His second Test century in South Africa.#SAvIND pic.twitter.com/lQhNuUmRHi
— BCCI (@BCCI) December 27, 2023
सेंच्युरियनमध्ये राहुलचे दुसरे शतक
दक्षिण आफ्रिका आणि सेंच्युरियनमध्ये राहुलचे हे दुसरे शतक ठरले. सेंच्युरियन येथील सलग दुसऱ्या कसोटीत त्याने शतक झळकावले. याआधी 2021 मध्ये राहुलने सेंच्युरियनमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते. तेव्हा त्याने 248 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. ती कसोटी भारताने जिंकली होती.
सेंच्युरियनमध्ये शतक झळकावणारा तिसरा खेळाडू
सेंच्युरियनमध्ये कसोटी शतक झळकावणारा राहुल हा तिसरा खेळाडू आहे. येथे सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने कोहली आणि सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिन आणि कोहलीने प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. कोहलीने 2018 मध्ये शतक झळकावले होते. सचिनने 2010 मध्ये शतक झळकावले होते.
सचिन आणि विराटच्या क्लबमध्ये सामील
राहुलने दक्षिण आफ्रिकेत दुसरे शतक झळकावले. आफ्रिकन भूमीवर एकापेक्षा जास्त शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. या बाबतीत तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत पाच शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराट आणि राहुलने प्रत्येकी दोनदा अशी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आशियाई फलंदाजांमध्ये राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. विराट-राहुलशिवाय पाकिस्तानच्या अझहर महमूद आणि श्रीलंकेच्या समरवीराने ही कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारे आशियाई फलंदाज
सचिन तेंडुलकर : 5 शतके
अझहर महमूद/टी समरवीरा/विराट कोहली/केएल राहुल : 2 शतके
#SAvsIND 1st Test Day 2 : राहुलचं शानदार शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला…
पंतलाही टाकलं मागे…
दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा राहुल हा भारताकडून दुसरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. यापूर्वी ऋषभ पंतने ही कामगिरी केली होती. मात्र, राहुलने पंतला एका बाबतीत नक्कीच मागे सोडले. म्हणजेच आफ्रिकन भूमीवर सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये राहुल अव्वल स्थानी पोहोचला आहे. राहुलने 101 धावा केल्या आहेत, तर पंतने 2022 मध्ये नाबाद 100 धावा केल्या होत्या.