#SAvsIND 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी (26 डिसेंबर) सुरुवात झाली. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात एकूण तीन खेळाडूंनी पदार्पण केले.
वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला भारताकडून पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याचवेळी फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅम आणि वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या सामन्यात खेळू शकला नाही.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे वरिष्ठ खेळाडू मैदानात परतले. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली तेव्हा रवींद्र जडेजाचे नाव नव्हते. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर या दोघांना संघात स्थान मिळाले पण जडेजाचे नाव नव्हते. दुखापतीमुळे जडेजा संघात नसल्याचे रोहितने सांगितले आहे.
नाणेफेकीपूर्वी बीसीसीआयने दिली माहिती…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले की, “रवींद्र जडेजाने सामन्याच्या सकाळी पाठीच्या वरच्या बाजूला दुखत असल्याची तक्रार केली. तो पहिल्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता.” नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्मानेही याबद्दल सांगितले. पाठीच्या दुखण्यामुळे जडेजाच्या अनुपस्थितीची रोहितने पुष्टी केली.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित म्हणाला, ”आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत खेळत आहोत. जडेजाच्या जागी अश्विन खेळत आहे. जडेजाला पाठीचा थोडा त्रास होता, त्यामुळे अश्विन संघात आला आहे. प्रसिध पदार्पण करत आहे. शार्दुल, सिराज आणि बुमराह हे अन्य वेगवान गोलंदाज आहेत. नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार रोहितने कबूल केले की, विकेटवर प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याची खात्री नव्हती. त्यामुळे नाणेफेक हरल्याचा आनंद झाला.
IND vs SA Live Score : दोन्ही संघांचे Playing -11
दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जोर्गी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (डब्ल्यू), मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.
🚨 Team News 🚨
Prasidh Krishna makes his Test debut.
A look at #TeamIndia‘s Playing XI 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/Zyd5kIcYso
𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Mr Ravindra Jadeja complained of upper back spasms on the morning of the match. He was not available for selection for the… pic.twitter.com/r7Tch9hueo
— BCCI (@BCCI) December 26, 2023
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या बॉक्सिंग डे कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. 1992 पासून दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही नववी कसोटी मालिका असेल, परंतु आतापर्यंत या देशात भारत एकही मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सध्याची मालिकाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक आव्हान असणार आहे.