नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. विराट आणि अनुष्काला कन्यारत्नाचा लाभ झालाय. कोहलीसाठी ही त्याच्या आयुष्यातील सर्वात ‘गोड’ बातमी ठरली आहे. याबाबतची माहिती विराट कोहली याने सोशल मीडियाव्दारे दिली . यातच विराटने सोशलवर पुन्हा एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये अशी विनंती फोटोग्राफरला केली आहे.
View this post on Instagram
त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,‘ आम्ही तुम्हाला विनंती करतो कि, आमच्या मुलीचे फोटो काढू नका. योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु, तोवर आम्हाला सहकार्य करा. असं म्हणत त्यांनी या पोस्ट मध्ये विनंती केली आहे.
View this post on Instagram
त्याने पुढे लिहिले आहे कि, ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही नक्की देऊ. मात्र आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला समजून घ्याल’ असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोशलवर त्यांना मुलगी होताच अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी ही पोस्ट लिहत सोशल मीडिया युजर्सला विनंती केली आहे.