मुंबई – करण जोहरच्या “कॉफी विथ करण’च्या शोमध्ये गमतीमध्ये सुरू झालेला संवाद आता सिरीयस बनत चालला आहे. आम्ही बॉलीवूडच्या नवीन जोडीबद्दल बोलत आहोत. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर आता रंगायला लागले आहे. मात्र दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे. ते अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही येऊन गेल्या आहेत.
सारा आणि कार्तिकच यांच नातं आता कसं आहे हे नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात रॅम्प वॉक करताना सारा अली खानचा पाय घरसल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
Thode din aur,phir hum sabko jalane wale hain Just wait ! Bas ache din aane wale hai….
तत्पूर्वी, लखनौमध्ये एकत्रित प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बाहेर पडलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. यावेळी कार्तिक साराची विशेष काळजी घेत होता.