युक्रेन- रशिया-युक्रेन युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. या युद्धाच्या दुसऱ्या दिवसी मोठी जिवीत हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केल्याचा आज दावा केला आहे. शिवाय 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली असल्याचा युक्रेनने आपल्या दाव्यात म्हंटले आहे.
View this post on Instagram
युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. जगभरात या मुद्याची चर्चा होत असतांना आता सोशलवर युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत आहे. या चर्चा अभिनेत्रीने पाठिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
View this post on Instagram
या अभिनेत्रीचे नाव नतालिया कोझीनोवा आहे. सोशलवर सध्या तिचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत नतालिया तिच्या अंगावर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे चित्र पाठीवर काढले आहे.
नतालिया कोझीनोवा हिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास लवकरच ती ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’, ‘तेरे जिस्म से जान तक’ या चित्रपटात काम केले आहे. अल्ट बालाजीवरील ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये नतालिया बोल्ड सीन देताना दिसली होती.