पश्‍चिम बंगालमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; दोघांचा मृत्यू, एक जखमी

मुरशीदाबाद: नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात दीड महिन्यांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. पश्‍चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सीएएला विरोध करणाऱ्या आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पश्‍चिम बंगालमधील मुरशीबाद येथे सीएए-एनआरसी विरोधात आंदोलन सुरू असताना हा प्रकार घडला.

पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन गटात निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. या ठिकाणी चक्क एकमेकांवर गोळीबार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसेत दोन जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याचप्रमाणे बिहारमधील सीतामढी येथे देखील या कायद्याच्या समर्थक व विरोधकांमध्ये आज प्रचंड हाणामारी झाली. ज्यामध्ये जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, केंद्राने देशभरात सीएए लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.