उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना सन 2019-20 चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहिर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवारी प्रदान करण्यात येणार आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय मंदिर येथे 30 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शाह आणि अशोक पत्की यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

उषा खन्ना या भारतीय चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शिका म्हणून यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या तिसऱ्या महिला संगीत दिग्दर्शिका. बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत खूप गाजले आहे. सन 1960-1980 या दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.