मुंबई – राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. याबाबतची विनोद तावडे यांनी ट्विट करत काल रात्री माहिती दिली आहे. यावर अनेक नेत्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
विनोद तावडे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “अत्यंत दु:खाने कळवत आहे की, माझी आई विजया श्रीधर तावडे यांचं दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले आहे.” विनोद तावडे यांच्या आईच्या निधनाने तावडे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बड़े दुख के साथ मैं आपको सूचित कर रहा हूँ कि मेरी माता जी विजया श्रीधर तावडे दीर्घकालीन बीमारी के चलते मुंबई में सांसारिक जीवन त्याग कर परलोक सिधार गयी हैं। pic.twitter.com/WwhEQXxllS
— Vinod Tawde (@TawdeVinod) April 10, 2023
दरम्यान, विजया तावडे यांची अंत्ययात्रा 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नेहरु रोड विलेपार्ले पूर्व येथून निघणार असल्याची माहिती तावडे कुटुंबीयांकडून सांगण्यात आली आहे. विजया तावडे यांच्या पश्चात त्यांचा पुत्र विनोद, विलास आणि विवेक ही तीन मुलं, मुलगी जयश्री, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे.