Eknath khadase join bjp : चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार आहेत. स्वतः खडसे यांनी याबाबत खुलासा करत लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याच म्हंटल आहे.
मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच यावेळी शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले,”मी शरद पवार यांचा ऋणी राहील त्यांनी मला संकटकाळात मदत केली.” तसेच आगामी पंधरा दिवसात मी दिल्लीत भाजपात प्रवेश करेल असं देखील खडसे यांनी यावेळी म्हंटले. | Eknath khadase join bjp
माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. जे पी नड्डा यांची देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसेंनी दिली. | Eknath khadase join bjp
भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांची होती असं देखील खडसेंनी यावेळी सांगितलं. तसेच चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासून चर्चा सुरु असल्याचं देखील खडसेंनी म्हंटले. | Eknath khadase join bjp