नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनयची शर्माची याचिका पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळून लावली आहे. विनयची शर्माची मानसिक स्थिती एकदम ठीक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
विनयने मानसिकरीत्या अस्वस्थ असल्याचे सांगून वैद्यकीय मदतीसाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. विनयने फाशीची शिक्षा टाळण्यासाठी तिहार तुरूंगातील त्याच्या खोलीत भिंतीवर डोके आपटून स्वत: ला जखमी केले होते. आपली मानसिक प्रकृती ठीक नाही. माझ्यावर उपचार करावेत, अशी याचिका त्याने न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्यावर तुरुंगातच उपचार केल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान दिल्लीच्या कोर्टाने निर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश कुमार सिंग (32), पवन गुप्ता (25), विनय कुमार शर्मा (26) आणि अक्षय कुमार (31) यांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.