मुंबई – सध्या बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’ची दमदार हवा पाहायला मिळत आहे. अशात एका हॉलिवूड चित्रपटाने केरला स्टोरीच्या कमाईला ब्रेक लावला आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस 10’ नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. या आधी देखील फास्ट अँड फ्युरियसचे सर्वच भाग हिट ठरले आहेत. त्यामुळे हा भागही दमदार कमाई करताना दिसत आहे.
फास्ट अँड फ्युरियस 10 प्रदर्शित होताच इतर स्थानिक चित्रपटांना याचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे. हा चित्रपट जगभर विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत धुमाकूळ घालत आहे. यामुळे भारतातील इतर अनेक प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईला ब्रेक लागला आहे.
फास्ट अँड फ्युरियसमुळे ऐश्वर्या रॉय स्टारर पोनीयन सिल्व्हन चित्रपट देखील मागे पडला आहे. तर कमाईच्या बाबतीत सुसाट सुरु असलेल्या केरला स्टोरीवर देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे बराच फरक पडला आहे.
विन डिझेल जस्टिन लिन जो रॉथ स्टारर ‘फास्ट अँड फ्युरियस-10’ची क्रेझ प्रचंड मोठी असल्याचे समजते. अॅक्शनने भरलेला या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग देखील फुल्ल झाले आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चार दिवसांत एकूण 59.75 कोटी आणि एकूण 71 कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्यामध्ये हिंदीमध्ये 27.9 कोटी, तमिळमध्ये 2 कोटी, तेलुगूमध्ये 1.55 कोटी आणि इंग्रजीमध्ये 28.3 कोटींचा व्यवसाय केला आहे.
जगभरचा विचार करता फास्ट अँड फ्युरियसने छप्पर फाड कमाईला सुरुवात केली आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत 2600 कोटींची कमाई केली आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस-10’ ची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे कि त्यासमोर अनेक चित्रपटांनी आपला गाशा गुंडाळला आहे.