Adah Sharma troll| ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्माला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नुकतेच अदाने इतर बॉलीवूड कलाकारांसह बाबा सिद्धिकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. मात्र अदा शर्माचं इफ्तार पार्टीला जाणं काही नेटकऱ्यांना आवडलं नाही. यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. परंतु अदाने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
दरवर्षी बाबा सिद्दिकी यांच्याकडून रमजानच्या महिन्यात केल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील मोठे सेलिब्रिटी उपस्थित राहतात. यंदा अभिनेत्री अदा शर्मासुद्धा या इफ्तार पार्टीला गेली होती. तिचा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर ट्रोलिंगला सुरुवात केली. ‘ही किती फ्रॉड आहे’, ‘मुस्लिमांविरोधातील चित्रपटात ही काम करते आणि आता त्यांच्याच इफ्तार पार्टीला जाते’, अशा कमेंट करत काही नेटकऱ्यांनी अदाला ट्रोल केले आहे.
What a fraud she is!!!
On Odd Days Muslims are Villains for these people and you make hate movies against them!!!
On Even Days Muslims are great for these people because you get invited for a Biryani!!! pic.twitter.com/ygNhPNMnkO
— Sridhar Ramaswamy శ్రీధర్ రామస్వామి ✋🇮🇳 (@sridharramswamy) March 25, 2024
तर आणखी एका नेटकऱ्याने ‘विषम दिवसांत यांच्यासाठी मुस्लीम वाईट असतात. त्यांच्याविरोधात चित्रपट बनवतात आणि सम दिवसांत हेच मुस्लीम यांच्यासाठी चांगले बनतात. कारण त्यांना बिर्याणी खाण्यासाठी बोलावलं जातं’, असे लिहिले. यावर अदा शर्मानेही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘प्रिय सर, विषम आणि सम दिवसांमध्ये दहशतवादी व्हिलन असतात, मुस्लीम नाही’, असे ट्रोलर्सना अदाने उत्तर दिले आहे.
अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर नुकताच तिचा ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिने आयपीएस अधिकारी नीरजा माधवन ही भूमिका साकारली आहे.
हेही वाचा:
‘बिग बॉस मराठी’ची शिव ठाकरेकडून पोलखोल,’बक्षिसाची रक्कम 25 लाख पण …’