वाघोली – वाघोली येथे वाघेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोणीकंद वाहतूक शाखा पोलिस व ग्रामस्थांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडीतून ग्रामस्थांची सुटका करण्याचा उपक्रम हाती घेतला.
Covid-19 च्या प्रादुर्भाव च्या वाढत्या प्रादुर्भाव काळापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सर्जेराव पाटील, प्रताप मानकर यांनीदेखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या साथीने वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कामगिरी केली होती.
या कामगिरीची सुरुवात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच झाली होती. याच कार्याची प्रचिती आता वाघोलीकर यांना महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच आली आहे. वाघोली येथील वाहतूक नियंत्रण समितीचे प्रमुख संपत गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे व इतर कार्यकर्ते व लोणीकंद वाहतूक शाखा कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसर चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांसोबत उभे राहून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली.
लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक नियंत्रण समितीच्या सर्व सदस्यांच्या साथीने आगामी काळात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल त्या त्या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामगिरी करणार असल्याचे वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाह संपत गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, लोणीकंद वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाघोलीतील ग्रामस्थ देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभे राहत असल्याने पोलिस व ग्रामस्थ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.