विक्रांत घेणार झेंडेचा बदला

“तुला पाहते रे’ आता वेगळ्याच टप्प्यावर आली आहे. विक्रांतची दिशाभूल करण्यात ईशा यशस्वी होते. ईशा आणि झेंडे यांचे जालिंदरबरोबरचे फोटो बघितल्यावर विक्रांतला वेगळाच संशय यायला लागला आहे. ईशा किंवा झेंडे या दोघांपैकी आपल्याशी नक्‍की कोण खोटे बोलते आहे, याचा तो विचार करायला लागला आहे. तेवढ्यात झेंडे आपण जालिंदरबरोबर फोटो काढल्याचे स्पष्टीकरण देतो. विक्रांत त्याला गप्प करतो आणि सीसीटीव्हीचे फुटेज झेंडेला दाखवतो. यामुळे दोघांमधील गैरसमज आणखीन वाढायला लागतो. विक्रांत झेंडेवर अविश्‍वास दाखवतो. तर ईशाच अविश्‍वास पसरवत असल्याचा दावा झेंडे करतो. या विश्‍वास अविश्‍वासाच्या चक्रात कथा आणखीन रहस्यमय बनायला लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.