लोपामुद्राला सलमान करणार मार्गदर्शन

बिग बॉस 10 मध्ये दिसलेली लोपामुद्रा राऊतचे करिअर बनवण्याची जवाबदारी सलमानने घेतली आहे. लोपामुद्राला आपल्या फ्रेंडस्‌र्कलमध्ये फिट करण्याचेही त्याचे प्रयत्न आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान हा गॉडफादर आहे. आजवर त्याने अनेक नवीन चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये संधी दिली आहे. त्याने संधी दिलेल्या यादीत बऱ्याच जणांचा समावेश असून त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

सलमान खान मागील 3-4 महिन्यांपासून लोपामुद्राला मार्गदर्शन करत आहे. त्यातच दोघांची मैत्रीही वाढते आहे. लोपामुद्रा सलमानच्या कुटुंबाला जाम आवडल्यामुळे आत्तापर्यंत अनेकदा सलमानच्या गॅलेक्‍सी अपार्टमेंटमध्ये ती दिसली. ती सलमानच्या फॅमिली फंक्‍शनमध्येही दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी लोपामुद्रा बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतही हजर होती. त्यापूर्वी सलमानच्या फार्महाऊसवरही लोपामुद्रा दिसली होती. याचे कारणही खास होते. आपल्या पर्सनल फोटोग्राफला सांगून सलमानने त्याच्या फार्महाऊसवर लोपाचे फोटोशूट केले होते.

लोपामुद्राचे करिअर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर फार गती घेऊ न शकल्यामुळे तिला सलमानने मदतीचा हात देऊ केला. भाईजानचे लोपाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देण्याचेही प्रयत्न आहेत. लोपा बिग बॉसच्या घरात एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होती. अर्थात ती शो जिंकू शकली नाही. पण स्वत:च्या स्मार्ट गेमने तिने प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केले होते. तिने मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही सहभाग घेतला. तिने 2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती या स्पर्धेत सेकंड रनर-अप राहिली होती. मॉडेलिंगच्या दुनियेतून आल्यामुळे हॉट आणि सेक्‍सी अंदाज लोपामुद्रासाठी काही नवा नाही. सोशल मीडियावर लोपामुद्रा स्वत:चे हॉट आणि सेक्‍सी अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.