मुंबई – प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या,’बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते.’ यामुळे महिलांना भीती वाटत असते.. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपस्थित लोकांसमोर त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून येत आहे.’ यावर आता पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांच्यावर विधानावर आपली भूमिका माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केली आहे.
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023
विजय वडेट्टीवार म्हणाले,’हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी स्वःताह मी शिवानीला विचारलं याबाबत विचारले आहे, हे विधान तू कुठला संदर्भ घेऊन बोललीस. यावर ती म्हणाली, सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातल हा संदर्भ आहे. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहे, ते उत्तम लेखक होते. त्यांनी जे लिहून ठेवले आहे त्यातील शिवानी वडेट्टीवार बोलल्या असतील. आणि जर असे काही लिहिलेले नसेल तर नक्कीच त्या माफी मागतील.’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली आहे.