Vidya Balan – मध्ये रिलीज झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने अभिनेत्री विद्या बालनचे आयुष्यच बदलून टाकले, या चित्रपटात विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. विद्याची किलर स्टाईल आणि इंटिमेट सीन्स प्रेक्षकांना खूप आवडले आणि या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. पण विद्या बालनला ही भूमिका करणं फारसं सोपं नव्हतं.
गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सत्रादरम्यान, विद्या बालनने सांगितले की, ‘जेव्हा तिला ‘द डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. अभिनेत्री म्हणते, ‘मिलन लुथरिया पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मला वाटलं, ‘कि ते चुकीच्या दारात तर आले नाही ना?’ कारण मला कोणीतरी खरोखरच ही भूमिका ऑफर करेल यावर विश्वास बसत नव्हता.
लोकांनी मला करिअर संपणार असा इशारा दिला…
विद्या बालनने पुढे खुलासा केला की, जेव्हा तिने सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी होकार दिला तेव्हा लोकांनी तिला सावध केले होते. चित्रपटात ही भूमिका केल्याने करिअर उद्ध्वस्त होईल, असे लोकांचे म्हणणे होते. ‘तिथे काही लोक होते ज्यांनी मला विचारले, ‘तुला खात्री आहे का? यामुळे तुझे करिअर बरबाद होईल.’
जेव्हा लोकांनी विद्याला सांगितले की ‘द डर्टी पिक्चर’ हे तिच्या करिअरच्या समाप्तीचे कारण असू शकते कारण अभिनेत्री दोनदा मिस गुडी झाली आहे, तेव्हा विद्याने उत्तर दिले की तिचा या लेबलशी काहीही संबंध नाही. असं म्हणत त्यावेळी विद्याने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.