खडकवासला – अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या तीन विकृत तरुणांवर हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. असून तिघांना अटक करण्यात आली आहे. ईश्वर अशोक शिंदे( वय २०) निलेश सूर्यकांत नेटके (वय २१) आणि कुणाल राजेश भांगरे( वय २०) सर्व रा. डोणजे तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ईश्वर अशोक शिंदे हा सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळजाई टेकडीवर संशयास्पद रित्या आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये त्यामध्ये तो साथीदारांसह अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे अशिल व्हिडिओ आढळून आले.
त्यानुसार सहकार पोलीस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल करून गुन्हा हवेली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. हवेली पोलिसांनी पीडित मुलांना व पालकांना शोधून काढल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली आहे.
आरोपींनी मारहाण करून लैंगिक अत्याचार केला व कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली पालकांच्या फिर्यादीवरून आरोपींवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार याबाबत अधिक तपास करीत आहेत