Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल २३ मेला थांबला आहे. या टप्प्यात 25 मे रोजी आठ राज्यांतील 58 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका झाल्या, येत्या ४ जूनला सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित केले जातील.
अशात सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मोदी म्हणाले,’ देवानेच मला पाठवलं आहे. कारण, माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिलीये असं वाटतं, असं वक्तव्य मोदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केले आहे.
व्हिडिओत मोदी म्हणाले की, ‘माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीच जन्म घेतलाय. पण, तिच्या निधनानंतर, मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. माझ्याकडून काही तरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.’असा दावाही त्यांनी केला आहे.
दावा करतांना त्यांनी मुलाखतीत सांगितले,’ही शक्ती केवळ एका साधारण शरीरात असू शकत नाही. पण, देवानेच माझ्यावर कृपा केली आहे. मला वाटतं देवाने काहीतरी चांगलं करण्यासाठी मला क्षमता, प्रेरणा दिली आहे. मी केवळ एक साधन आहे. त्यामुळे मी जे काही करत आहे, ते देवानेच मला करायला सांगितलंय असं मी मानतो.’ असं मोदी म्हणाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
हे वाचाल का ?